पिंपरी / चिंचवड

पत्नी आणि सासूवर खुनी हल्ला प्रकरणी पती अटकेत

पिंपरी l प्रतिनिधी

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर सत्तूरने वार केले. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सासूवर देखील खुनी हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी आणि सासू दोघी गंभीर जखमी झाल्या. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी साडेतीन वाजता वाल्हेकरवाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

सुभाष नामदेव गायकवाड (वय 40, रा. नाव्हरे, ता. शिरूर) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरी त्यांचा मेव्हणा आरोपी सुभाष याने फिर्यादी यांच्या बहिणीवर म्हणजेच सुभाष याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारण्याच्या उद्देशाने आला. त्याने सत्तूरने फिर्यादी यांच्या बहिणीच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची आई मध्ये गेली. त्यावेळी आरोपीने त्यांना देखील डोक्यात, हातावर सत्तूरने मारून गंभीर जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button