रुपीनगरात स्वच्छता महिलांचा सन्मान; पोलीस चौकीला पाण्याची टाकी भेट…
![Honoring cleanliness women in Rupnagar; Water tank visit to police station ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/908a7bfd-571d-4459-9bc1-fdf5a77675ad.jpg)
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती विधायक उपक्रमांनी साजरी…
निगडी |
निगडी रूपीनगर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठाण यांच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर कोरोना वैश्विक संकटात आपला जीव धोक्यात घालून कठीण काळात परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अखंडपणे सेवा देणाऱ्या स्वच्छता महीला कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य आणि कार्याची दखल घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त साडी देऊन सन्मान करण्यात आला. त्याच प्रमाणे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शहरातील अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहे. याचीच खबरदारी म्हणून रुपीनगर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठाण तर्फे चिखली पोलिस ठाणे अंकित रुपीनगर पोलिस चौकीतील अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य निरोगी राहावे तसेच पोलिस चौकीमध्ये नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने हात वारंवार धुण्यासाठी पाण्याची टाकी भेट देण्यात आली.
प्रतिष्ठाणच्या या समाजपयोगी स्तुत्य उपक्रमामुळे प्रतिष्ठाणचे परिसरात कौतुक होत आहे. यावेळी पोलीस निरीक्षक संदेश इंगळे, पोलीस नाईक शंकर यमगर, नगरसेवक प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, स्वीकृत सदस्य पांडुरंग भालेकर, मा.शिक्षण मंडळ सभापती धनंजय भालेकर, मा. नगरसेवक शांताराम भालेकर, एस. डी.भालेकर, दादा नरळे, अमोल भालेकर, रामदास कुटे, अनिल भालेकर, संदीप जाधव, संतोष पवार, राजाभाऊ धायगुडे आदी उपस्थित मान्यवर होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गजानन वाघमोडे, उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, दत्ता करे, शिवाजी बिटके, राजेंद्र सोनटक्के तसेच प्रतिष्ठाणच्या सर्व सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित चौगुले यांनी तर, आभार अध्यक्ष गजानन वाघमोडे यांनी मानले.