पिंपरी-चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’चा थरार; भरधाव कारचालकाने दुचाकीस्वाराला फरफटत नेले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Pimpri-Chinchwad-Hit-and-Run-780x470.jpg)
पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. पिंपळे गुरव मेन बस स्थानकाजवळ बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका भरधाव कारचालकाने दुचाकीस्वाराला फरफटत नेले आहे. या घटनेत दुचाकी चालकासह इतर एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे.
घटनेच्या दिवशी कार चालकाविरोधात तक्रार नसल्याने ताब्यात घेतलेल्या कारचालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेतला नाही. परंतु, सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांपर्यंत बातम्या आल्यामुळे सांगवी पोलीस तत्परतेने कारचालकाचा शोध घेताना दिसत आहेत.
हेही वाचा – बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात; बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाचा भारताला इशारा!
दरम्यान, पालघरच्या मनोर रोडवरील गणेश घाटात दुचाकीस्वाराला भरधाव कारने चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार सागर पाटील याचा जागीच मृत्यू झाला आहे. सागर आपल्या कामावरून घरी परतत असताना त्याचा अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालकाला मनोर पोलिसांनी अटक केली आहे.