Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवडमध्ये परतीच्या पावसाची ‘मुसळधार हजेरी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/PCMC-Rain.jpeg)
पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी सकाळपासूनच ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरु झाला. सकाळी अचानक सुरु झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. सकाळी सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस पडला. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत पावसाने थोडीशी उसंत घेतली मात्र. तीन नंतर शहरात सर्वत्रच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, तळवडे, चिखली, देहू, देहूरोड, वाकड, रहाटणी, हिंजवडी, या भागासह सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, काळेवाडी, भोसरी, कासारवाडी, दापोडी या भागातही मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत.
या पावसाने रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले. खड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन आदळून अपघाताच्या घटनाही घडल्या. निगडी, आकुर्डी, प्राधिकरण येथील भुयारी मार्गात तळे साचले.