हॉटेलमध्ये जेवायला म्हणून नेले आणि लॉजवर नेऊन बलात्कार केला : तरुणाला अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Rape.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
एका अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये जेवायला नेतो असे सांगून तिला टेम्पोमध्ये बसवून नेले. हॉटेलमध्ये न नेता तिला लॉजवर घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला. घडलेल्या प्रकाराबाबत घरच्यांना सांगितल्यास बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 24) दुपारी अडीच वाजता कृष्णानगर, चिंचवड आणि अजंठानगर, निगडी येथे घडली.
युवराज साळुंखे (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीने शनिवारी (दि. 27) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी मुलीला त्याच्या टेम्पोत जबरदस्तीने बसवले. मुलीला हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी घेऊन जातो असे सांगून तिला अजंठानगर येथील एका लॉजवर नेले. तिथे मुलीसोबत जबरदस्ती करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ‘तू जर आई बाबांना सांगितले तर तुला बघून घेतो’ अशी आरोपीने धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.