पिंपरी / चिंचवड
दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग करून आयफोन फोडला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/1609358382_molestation-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
दारूच्या नशेत महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यांनतर महिलेला शिवीगाळ करून तिचा आयफोन मोबाईल फोडून नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 20) दुपारी सव्वातीन वाजता शिरगाव येथे घडली.
सिद्धेश्वर बाळू नाणेकर (वय 36, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत दारूच्या नशेत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केला असता आरोपीने तिला नखाने बोचकरून जखमी केले. त्यांनतर शिवीगाळ, दमदाटी करून आयफोन 11 मॉडेलचा मोबाईल फोन फोडून नुकसान केले. फुटलेला मोबाईल फोन आरोपी घेऊन गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.