सासरच्यांनी पैसे न दिल्याने विवाहितेचा छळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/Molestation_2017082358.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
गाडी घेण्यासाठी तसेच घराचे पैसे फेडण्यासाठी विवाहितेच्या आई वडिलांनी पैसे दिले नाहीत. त्यावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 5 जानेवारी 2014 ते 27 मार्च 2022 या कालावधीत बीड आणि पेन ठाणे येथे घडला. विवाहितेने माहेरी आल्यानंतर याबाबत फिर्याद दिली आहे.
पती विकास बळीराम ढाकणे (वय 37), सासरे बळीराम एकनाथ ढाकणे (वय 60), दीर प्रकाश बळीराम ढाकणे, मावस दीर चौरंग ढाकणे, तीन महिला (सर्व रा. धानोरा रोड, बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत विवाहितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या आई वडिलांनी आरोपींना गाडी खरेदी करण्यासाठी तसेच घराचे पैसे फेडण्यासाठी पैसे दिले नाहीत. या कारणावरून फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादीला वारंवार शिवीगाळ करून हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.