breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

Pune | ‘पीएमआरडीए’च्या अतिक्रमण विभागाची दुटप्पी भूमिका

अनधिकृत बार, पब, हॉटेलवर हातोडा मात्र बांधकाम, टपऱ्यांकडे दुर्लक्ष

पुणे | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या अतिक्रमण विभागाकडून करवाईबाबत दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप व्यवसायिकांनी केला आहे. पुणे येथील अपघात प्रकरणानंतर हिंजवडी आयटी पार्कमधील अनधिकृत पब, बार आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. नुकतेच पाच ठिकाणी कारवाई केली. यामध्येही काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. मात्र, याच परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, चौपाट्या सुरु आहेत, मात्र याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जात आहे. राजकीय व्यक्तींचेच अनेक अनधिकृत बांधकाम असल्याने यावर कारवाई केली जात नाही.

पुण्यातील अपघात प्रकरणानंतर ‘पीएमआरडीए’चे अतिक्रमण विभाग जागे झाले आणि हद्दीतीलअनधिकृत पब, बार आणि रेस्टोरंट यावर कारवाई सुरु केली. नुकतेच आयटी पार्क मधील देजा वूबिस्ट्रो, द 3 मस्कीटर, ब्लू ग्रास बार अँड बँक्वेट, हॉटेल लक्ष्मी बार, बर्ड व्हॅली बार रेस्टॉरंट असे ५अ नधिकृत हॉटेल, पब, बार आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आले. यात २३ हजार ४१७ चौ. फूटक्षेत्रावरील अनधिकृत हॉटेल, पब, रेस्टॉरंट व बार पोकलेन, जेसीबी, गॅस कटर व मनुष्यबळाच्यासाहाय्याने निष्कासित करण्यात आले. या ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहनकारवाईस उपस्थित असलेल्या पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातीलअधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले.

हेही वाचा      –        सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या; एम. व्यंकटेशन 

हिंजवडी आयटी पार्कमधील पब, बार, रेस्टो वर कारवाई सुरु आहे. मात्र पौड रस्त्यावर अनेक भूगाव, भुंकप, सुस या परिसरात अनेकअनधिकृत असणाऱ्या आस्थापनेवर कारवाई केला जात नसल्याचा आरोप व्यवसायिकांनी केला आहे. हिंजवडी, माण, मारुंजी, पौडरस्ता, पौड, मुळशी आणि इतर ‘पीएमआरडीए’च्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामामध्ये व्यवसाय सुरु आहेत. मात्रत्यावर कारवाई केली जात नाही. आयटी परिसरात चौपाट्यांचे पेव फुटले आहे. यातील अनेक चौपाट्या अनधिकृत आहेत. मात्र यावरकारवाई केली जात नाही.

‘अनधिकृत होर्डिंग’वर होणार कारवाई..

आकाशचिन्ह कारवाई विभागाने तहसीलदार सचिन म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत होर्डिंग निष्कासनाचा १५ ते ३१जुलैपर्यंतचा नियोजन आराखडा तयार केला असून मुळशी येथील ४ अनधिकृत होर्डिंग भुईसपाट केले. ज्यांनी प्राधिकरणाकडेपरवानगीसाठी अर्ज केले नाहीत अशा होर्डिंगवरही कारवाई करण्यात येणार आहे.

पुण्यातील आपघातानंतर अनधिकृत बार, पब आणि रेस्टारंट वर कारवाई करणे गरजेचे आसल्याने त्यावर कारवाई केली. मात्र आताइतर अनधिकृत बांधकाम, टपऱ्या, चौपाट्या व वाहतूक आडथळला निर्माण करणाऱ्या हातगाड्या यावर कारवाई होणार आहे.

– अनिल दौंडे, अतिक्रमण विभाग, पीएमआरडीए.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button