ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचा आमदार महेश लांडगे यांना दिव्य आशिर्वाद!

"गुरुदेवांच्या आशिर्वादाने सकारात्मकता, प्रेरणादायी अनुभव" : आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड | आमदार महेश लांडगे यांना आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा व त्यांच्या करस्पर्शातून आशिर्वाद घेण्याचा दिव्य योग लाभला. गुरुदेवांच्या सान्निध्यात बसताना, “गुरू म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ज्योत आणि मनातील गोंधळ शांत करून आत्म्याशी भेट घडवणारा सेतू” ही अनुभूती आमदार लांडगे यांनी प्रत्यक्ष जाणवली, असे त्यांनी सांगितले.

गुरुदेवांच्या स्मितहास्यातून मिळालेल्या करुणा आणि आश्वासक शक्तीमुळे मनातील सर्व ताण, भीती आणि संभ्रम क्षणात विरून जातात, असे आमदार लांडगे यांनी अनुभवाचे वर्णन केले. या भेटीत श्री. श्रेअंश चौधरी, श्री. ओंकार सावंत, श्री. सूर्यकांत जाधव, श्री. अभिजित भानाप, श्री. गिरीश देशमुख तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक स्वामी प्रणवानंदजी उपस्थित होते.

हेही वाचा      :            Mumbai Pune Expressway | पुणे मार्गिकेवर पहाटेपासून ट्राफिक जॅम! 

यावेळी आमदार लांडगे यांनी बेंगलुरु- कर्नाटक येथील ‘‘श्री श्री गुरूकुलम’’ वेद आगम संस्कृत महापाठशाळेची पाहणी केली. येथे विद्यार्थ्यांना वेद, आगम, संस्कृत, ज्योतिष, योग, संगीत, वैदिक गणित व शिल्पशास्त्र यांचा मोफत अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना गुरु-शिष्य परंपरेतून शिक्षण दिले जाते, जे प्राचीन भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्यांचे संवर्धन करीत आहे.

तसेच, आमदार लांडगे यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री गौशाला येथे भारतीय गोवंश संवर्धनाचे कार्य पाहिले. त्यांनी गौशाळेतील जैविक पद्धतीने चालणारे प्रकल्प आणि गोवंशापासून मिळणारी उत्पादने पाहून कौतुक व्यक्त केले. आमदार लांडगे म्हणाले, “गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली समाजात प्रेम, शांतता आणि सकारात्मक जीवन मूल्ये रुजवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगची कार्ये अत्यंत प्रेरणादायी आहेत. या भेटीमुळे मला समाजसेवेत नवीन दिशा व ऊर्जा मिळाली आहे.”

गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची प्रत्यक्ष भेट आणि त्यांच्या आशिर्वादाने मनात एक अद्भुत स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजात प्रेम, शांतता आणि आदर्श जीवनमूल्ये रुजवणे ही खरी प्रेरणा आहे. हा अनुभव केवळ व्यक्तिशः भेट नव्हता, तर अंतर्मनाचा एक दिव्य प्रवास होता, ज्याने माझ्या समाजसेवेला नवीन दिशा आणि ऊर्जा दिली आहे. गुरुदेवांच्या कृपेने अशक्यही शक्य होऊ शकते, आणि या भेटीने मला याचा अनुभव थेट अनुभवायला मिळाला.

– महेश लांडगे, आमदार, पिंपरी-चिंचवड, पुणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button