समाजाच्या हितासाठी गुजराती बांधवांनी पुढाकार घ्यावा : मुकेश चुडासमा
![Gujarati brothers should take initiative for the welfare of society: Mukesh Chudasama](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-28-at-1.53.31-PM-780x300.jpeg)
पिंपरी: श्री वैश्य सुथार पुना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने थेरगाव येथे स्नेहमिलन कार्यक्रम दिपावली व नूतन वर्षानिमित्त एकत्रित येवून साजरा करण्यात आला. त्यावेळी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा व विपुल वाढीया यांच्यामार्फत कार्यक्रम आयोजन करण्यात आला होते.
यावेळी समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा समाज बांधवांना उद्देशून म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात नोकरी, व्यवसायानिमित्त आपण गेल्या अनेकवर्षे या शहरात वास्तव्य करीत असलो तरी, गेली दोन वर्षे आपण एकत्रित नव्हतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काहींचे दु:खद निधन झाले. अशा समाज बांधवांच्या मदतीसाठी एकत्रित येऊन अशा कुटुंबियांना आधार देण्याची आवश्यकता आहे. समाजातील हुशार मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत लागेल, संस्था प्रयत्नशील राहील, त्यासाठी आज मोठ्या संख्येने एकत्रित आलो, यासाठी मुकेश चुडासमा यांनी समाज बांधवांचे विशेष आभार मानले.
यावेळी प्रविण वाढीया, लालजी चुडासमा, सुधीर वाजा, रमेश चुडासमा, हिरेन वाढीया, विराज चुडासमा, करण चुडासमा, यश वाढीया, अतुल सुद्रा, मेघ वाढीया, हिरेन वाजा तसेच, महिला जयाबेन वाढीया, कुसुमबेन पढीयार, सविताबेन पढीयार, रंजनबेन चुडासमा, भानु चुडासमा, धर्मिष्ठा वाढीया, आरती वाढीया, हिनल वाढीया, खुशी वाढीया, कोमल चुडासमा, मिनू चुडासमा, धारा सुद्रा आदी उपस्थितांच्या वतीने कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला.