breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेख

ग्राऊंड रिपोर्ट: भ्रष्टाचाराच्या मुद्यावर पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस ‘सरेंडर’?

भामा आसखेडच्या ‘जॅकवेल’ चा विरोध मावळला : पाणी पुरवठ्याचे संपूर्ण श्रेय भाजपाने घेतले

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडला २६७ एमएलडी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.  त्यामुळे आगामी ३० वर्षांत पिंपरी-चिंचवड जलस्त्रोतांमध्ये आत्मनिर्भर होणार आहे. भारतीय जनता पार्टीने या प्रकल्पांचे श्रेय वाजत-गाजत घेतले. मात्र, ‘जॅकवेल’ मधील भ्रष्टाचाराच्या मुद्यावर अकांडतांडव करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गुडघे टेकले का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

भामा आसखेड प्रकल्पांतर्गत धरणात पाणी उपसा करण्यासाठी जॅकवेल उभारण्यात येणार आहे. त्या कामाची निविदा प्रक्रिया महापालिका प्रशासनाने राबवली होती. मात्र, या कामात भ्रष्टाचार झाला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केला होता. मात्र, महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ‘व्यापक जनहित’ चा मुद्दा पुढे करुन निविदा प्रक्रिया राबवली. यावर गव्हाणे यांनी न्यायालयात दाद मागणार, अशी भीष्मप्रतिज्ञा केली होती.

वास्तविक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सत्ताकाळात पाटबंधारे विभागाकडून आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातील पिंपरी-चिंचवडसाठीचे पाणी आरक्षण जाहीर झाले होते. मात्र, तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने शहराशी निगडीत महत्त्वाच्या मुद्याकडे दुर्लक्ष केले.  त्याचा फटका आता गव्हाणे आणि टीमला बसत आहे.  आता राष्ट्रवादीच्या काळातील प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण भाजपा करीत आहे, अस म्हणण्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या हातात काहीही राहिले नाही.

राष्ट्रवादीचे भ्रष्टाचाराचा मुद्दा सोडला का?

भामा आसखेड जॅकवेल प्रकरणात अजित गव्हाणे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, त्यासाठी काही रक्कम भरण्यात सांगितल्याचे प्रशासनाकडून समजले. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अद्याप आलेले नाही, असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीसह अजित गव्हाणे यांनी ‘जॅकवेल’मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा सोडला का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीसांमुळे पाणी प्रकल्पांना गती…

पिंपरी-चिंचवड शहरासाठी भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या 26 किलोमीटर जलवाहिनीच्या कामासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देताच जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. जागेचे भूसंपादन करण्यासाठी मावळ आणि खेड उपविभागीय अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नियुक्ती केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटनने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाले. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील संपूर्ण मंजूर पाणी आणल्याशिवाय पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार नाही. आंद्रा आणि भामा आसखेड या दोन धरणातून 267 एमएलडी पाणी पिंपरी-चिंचवडला आरक्षित केले आहे. आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. यातून शहरातील पाणी समस्येवर तोडगा निघणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button