भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन
![Greetings to Maulana Abul Kalam Azad, the first Minister of Education of India](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-11T163036.244.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते अजहर खान, नियाझ देसाई, जाफर मुल्ला, शहाबुद्दीन शेख, नवाज शेख, इम्रान बिजापुरे, महंमदअली सय्यद, रुहिनाज शेख, कलिंदर शेख याप्रसंगी उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षण प्रसारासाठी थोर स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून काम करताना त्यांनी शोषित समूहाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न सदैव स्मरणात राहतील असे महापौर ढोरे म्हणाल्या.
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उल्हास जगताप यांनी देखील पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.