Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त अभिवादन
![Greetings on the occasion of Pandit Deendayal Upadhyay's birthday on behalf of Pimpri Chinchwad Municipal Corporation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Webp.net-compress-image-2-1-e1632554646588-1.jpg)
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, माजी महापौर राहुल जाधव, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, स्विकृत सदस्य भीषण चौधरी, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.