Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘आजी-आजोबा दिन’! : संत साई हायस्कूलमध्ये उत्साहात झाला आनंदोत्सव

शिक्षण विश्व : आधुनिक पालकत्व आणि आजी-आजोबांची भूमिका मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड | संत साई हायस्कूल, आदिनाथ नगर येथे आज अतिशय उत्साही आणि आनंदमय वातावरणात ‘आजी-आजोबा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा उद्देश आजी-आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्या अनुभवसंपन्न जीवनातून मूल्यशिक्षण घेणे, तसेच मुलांना त्यांच्या आजी-आजोबांशी अधिक प्रेमळ नातं जोडण्यासाठी प्रेरित करणे हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने आजी-आजोबांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक श्री. शिवलिंग ढवळेश्वर सर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून जीवन, शिक्षण आणि मंदिर या तीन संकल्पनांचा अर्थ समजावून सांगितला. तसेच आधुनिक पालकत्व, विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि आजी-आजोबांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.

हेही  वाचा       :            ‘अजित पवार यांच्या अंगाच पाकड्यांचं रक्त’; संजय राऊतांची टीका 

शाळेतील शिक्षकांनी आजी-आजोबांसाठी विविध रंजक खेळांचे आयोजन केले. या खेळांमध्ये आजी-आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान दृश्यतः अनुभवता आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सेल्फी पॉईंटवर जाऊन आपल्या नातवंडांसोबत छायाचित्रे काढली. अनेकांनी आपली कृतज्ञता व्यक्त करत शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शाळेच्या संचालिका सौ. सुनीता ढवळेश्वर मॅडम, विश्वस्त सौ. पायल ढवळेश्वर, उपमुख्याध्यापिका सौ. रुपाली खोल्लम, सौ. भारती ढवळेश्वर, सौ. संगीता पाटील, सौ. आरती मुट्टगीशेत्तर तसेच शिक्षकवृंदातील सौ. स्वाती मोघे, सौ. सुवर्णा तुकोळ, सौ. पवित्रा सारकी, सौ. शितल गवांदे, श्री. संजय अनार्थे व श्री. मनोज वाबळे सर यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले. प्रास्ताविक सौ. सुनिता चौहान मॅडम यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button