breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शासन आदेशाला शाळांकडून केराची टोपली

पिंपरी : बदललेल्या जीवनशैलीमुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात पूर्व प्राथमिक ते चौथीचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवावेत, असे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिले. त्यानुसार, महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व खासगी व महापालिकेच्या शाळांना पत्र दिले. मात्र, त्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी शाळा नेहमीच्या सकाळी सात वाजता सुरू असल्याने त्यांनी शासन आदेशालाच केराची टोपली दाखवल्याचे(PCMC) समोर आले आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवण्याबाबत 8 फेब्रुवारी 2024 रोजी परिपत्रक काढले होते. शासनाच्या संकेतस्थळावर ते प्रसिद्ध केले तसेच त्याची प्रत शिक्षण आयुक्त यांच्यासह शिक्षण संचालक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या कार्यालयापर्यंत पोहचली. असे असतानाही नवीन शैक्षणिक वर्षात शाळा पूर्वीच्या सकाळी 7 च्या वेळेतच(PCMC) भरत आहेत.

हेही वाचा –  पुणे पोर्शे अपघात प्रकरणी पुणे पोलिस सुप्रीम कोर्टात जाणार

शाळेच्या वेळेसंदर्भात आता महापालिका शिक्षण विभागाने खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे. ज्या शाळा व्यवस्थापनाला शाळेची वेळ बदलणे अगदी शक्य नाही, अशी अडचण शिक्षण विभागाकडे सांगितल्यास त्यावर मार्गदर्शन करून योग्य निर्णय घेता येईल असे शासन आदेशात म्हटले आहे. महापालिकेच्या जवळपास 45 शाळांची वेळ बदलण्याचे काम सुरू झाले असून बाकी शाळांचे सत्र बदलण्यात आले आहे. शासन आदेशाचे पालन करण्यासंदर्भात पुन्हा खासगी शाळांना पत्र काढले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button