breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवड

सरकार मस्त जनता त्रस्त : युवक राष्ट्रवादीचे एसटी भाडेवाढ विरोधात आंदोलन

पिंपरी । महाईन्यूज ।

राज्य सरकारने दिवाळीच्या तोंडावर एसटी तिकीट दरामध्ये दहा टक्के वाढ केली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे याचा निषेध म्हणून युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वल्लभनगर एसटी स्टँड येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन घेण्यात आले.

“सरकार मस्त जनता त्रस्त” “खाजगी बस चालकांना शंकरपाळी सामान्य नागरिकांनी दिली महागाई दिवाळी” “एसटी दरवाढ रद्द झालीच पाहिजे” या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी ऑटो रिक्षा एसटी प्लॅटफॉर्मवर लावून चला पिंपरी चिंचवड ते ठाणे या घोषणा यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे देण्यात आल्या.
यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना गरिबांची एलर्जी असून एसी बस ची दरवाढ न करता सर्वसामान्यांची लाईफ लाईन असणारी लालपरी साधी बसचे तिकीट दरामध्ये वाढ केली असून याची झळ सर्वसामान्यांना बसणार आहे. खरतर राज्य सरकारने चौपट भाडेवाढ करणाऱ्या खाजगी बस धारकांना धारेवर धरायला पाहिजे होते आणि गैरप्रकारे वाढवलेले तिकीट यावर अंकुश लावायला पाहिजे होते तसेच जादा बस सोडून आणि केंद्र सरकार मधील वजन वापरून जादा रेल्वेची व्यवस्था या सणासुदीत करायला पाहिजे होती परंतु ते न करता एसटी चे तिकीट वाढवले आहे. यावरून राज्याप्रती त्यांची उदासीनता दिसून येते. दसरा मेळाव्याला २७०० एसटी बस मुख्यमंत्री राज्यातून मुंबईला घेऊन जातात त्याचा देखील हिशोब महाराष्ट्राला मिळाला पाहिजे याची देखील मागणी यावेळे इम्रान शेख यांनी केली.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले “पुणे पिंपरी चिंचवड शहरात राज्यातील लाखो लोक व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले आहेत परंतु प्रत्येक दिवाळी सणानिमित्त हे सर्व लोक एसटी बस ने आपापल्या गावी जातात आणि यात सरकारने तिकीट दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचं काम एक प्रकारे केला आहे. एक तर प्रचंड महागाई या भाजप सरकारने देशावर व राज्य वर लादली असून त्याचा सामना या देशातील नागरिक कसाबसा करीत आहे. प्रत्येक वस्तू दर गगनाला भिडले आहेत मग ते सुईपासून भाज्या पासून तेल पर्यंत भाववाढ या भाजप सरकारने केली असून महागाईचा सामना करण्याची वेळ सणासुदीला सामान्य नागरिकांवर आली आहे. त्यात अशी एसटी तिकिटाची दरवाढ करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे हा प्रकार भाजप सरकार करत आहे. एसटी तिकीट दरवाढ मागे घेतली नाही तर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन घेण्यात येईल याचा इशारा यावेळेस अजित भाऊ गव्हाणे यांनी दिलाय.
महिला अध्यक्ष कविता अल्हाट म्हणाल्या “गोरगरिबांना आधीच कमी पगार असतो त्यात दिवाळीच्या समोर एसटी बस तिकीट दरवाढमुळे सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने आम्ही याचा तीव्र निषेध करतो.

यावेळी शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, युवकअध्यक्ष इम्रान भाई शेख, महिला अध्यक्ष कविता अल्हाट, संगीता कोकणे, मीरा कदम,समिता गोरे,उज्वला शिंदे , युवक विधानसभा अध्यक्ष आयुष निंबाळकर, उपाध्यक्ष रोहित वाबळे, अमोल रावळकर, दिनेश पटेल, मंगेश बजबळकर, युवक सरचिटणीस दीपक गुप्ता, स्वप्निल गायकवाड, सागर वाघमारे, युवा नेते राहुल पवार, अर्बन सेलचे दत्तात्रय जगताप, अकबर मुल्ला, ओम शिरसागर अनुज देशमुख, माजी नगरसेवक उत्तम हिरवे, मयूर खरात, तुषार ताम्हणे, कामगार नेते युवराज पवार, सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष समीर थोपटे व मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button