Good News : येस बॅकेतील पिंपरी चिंचवड महापालिकेचे 984 कोटी घेतले परत
पिंपरी महाईन्यूज
येस बँकेवर आरबीआयने निर्बंध लागू केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेला मोठा आर्थिक झटका बसला होता. महापालिकेचे कररुपाने गोळा झालेले तब्बल 984 कोटी रुपये येस बँकेत अडकले होते. त्यामुळे महापालिका आर्थिक अडचणीत आली होती. दरम्यान, एका महिन्यात बॅकेवरील निब॔ंध उठविल्यानंतर व्यवहार सुरळीत झाले. त्यानंतर महापालिकेने 984 कोटी रुपये काढुन घेतले आहेत.
येस बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी (दि.5) निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला 50 हजार रुपयेच काढता येणार होते. त्यामुळे पिंपरी महापालिकेला देखील पैसे काढता येणार नाहीत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न महापालिका विविध बँकांमध्ये जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी ठेवीच्या स्वरुपात ठेवला जातात.
येस बँक खासगी असल्याचे माहिती असून देखील पिंपरी महापालिकेने अधिक व्याजाच्या अपेक्षेने 2018 पासून या बँकेत दैनंदिन रोख भरणा करण्यास सुरुवात केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी देखील त्याला मान्यता दिली. महापालिकेच्या येस बँकेत सुमारे 984 कोटी रुपये अडकले आहेत. त्यावर 8.15 टक्के व्याज मिळत होते. परंतु, येस बँकेवर घातलेल्या निर्बंधामुळे महापालिकेला मोठा झटका बसला होता.
दरम्यान, येस बॅकेतील ठेवीवरुन भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप झाले. सव॔ खापर आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे वर फोडण्यात आले. आयुक्तांनी आरबीआयला पञ लिहुन पैसे सुरक्षित ठेवुन पैसे लवकर मिळावे,अशी मागणी केली. परंतु, आरबीआयने निब॔ंध लवकर उठविल्याने 17 माच॔ पासुन व्यवहार सुरळीत झाले. त्यामुळे 19 माच॔ रोजी महापालिकेचे 984 कोटी रुपये बॅकेतुन काढून घेण्यात आले आहेत,अशी लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी दिली.