ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बर्ड व्हॅली ‘लेझर शो’चे काम जलद गतीने पूर्ण करा; तुषार हिंगे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरी चिंचवड | चिंचवड संभाजीनगर येथील बर्ड व्हॅलीत उभारण्यात येत असलेल्या ‘फाउंटन’ व ‘ लेझर शो’चे काम रखडले आहे. कामाच्या ठिकाणी सर्व इलेक्ट्रिक वस्तू धूळ खात पडल्या आहेत. या कामाच्या निविदेमध्ये तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. कोट्यवधी रुपयांची निविदा दिलेल्या कंपनीकडून काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करून हा महत्त्वकांक्षी प्रकल्प नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे यांनी केली आहे.या संदर्भात तुषार हिंगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी – चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील संभाजीनगर येथील बर्ड व्हॅलीमध्ये म्युझिकल फाउंटन व लेझर शोचे काम गेल्या वर्षीपासून सुरू आहे. यामध्ये 61 बाय 21 मीटरचे म्युझिकल फाउंटन, 30 बाय 12 मीटरचे वॉटर स्क्रिन, 18 9 टूडी व थ्रीडी नोझल, 272 एलईडी दिवे आहेत. 180 ते 200 नागरिकांची आसन व्यवस्था आहे. लेझर व व्हिडीओ प्रोजक्टरद्वारे वॉटर स्क्रिनवर शहराची जडण घडण दाखविण्यात येणार आहे.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांची भेट, चापेकर बंधू, वारकरी संप्रदाय या ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक घटनांचे चित्र नागरिकांना दाखविले जाणार आहे. शहराच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीही लेझर शोच्या माध्यमातून मांडली जाणार आहे. या कामाची निविदा मार्च 2020 मध्ये जाहीर करण्यात आली. त्यासाठी निविदेची रक्कम 10 कोटी 70 लाख रुपये ठरली असून, दिल्लीच्या कंपनीला हे काम देण्यात आले. मात्र, गेल्या वर्षांपासून एप्रिल, ऑगस्ट व डिसेंबर 2021 अशी तीनवेळा कामाची मुदतवाढ करण्यात आली असून अतिशय संथ गतीने हे काम सुरू आहे.

कोरोना काळात कामावर मर्यादा असल्याचे मान्य असले तरी आता परीस्तीती सुरळीत झालाय असतानाही काम संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. शहरासाठी हा महत्वकांक्षी प्रकल्प असून नागरिक यासाठी प्रतीक्षेत आहेत. तरी हे याठिकाणी पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी. आवश्यक असणारी साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. तसेच, रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून हा प्रकल्प नागरिकांसाठी खुला करावा, असे तुषार हिंगे यांनी नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button