Breaking-newsपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलचा जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत डंका

शिक्षण विश्व: १७ सुवर्ण, ८ रौप्य व १ कांस्य पदकांची कमाई

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग (भारोत्तोलन) स्पर्धेत गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार कामगिरीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अण्णासाहेब डांगे जलतरण तलाव, नेहरूनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत गायत्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकूण १७ सुवर्ण, ८ रौप्य आणि १ कांस्य पदक जिंकत दिमाखदार यश संपादन केले.

गायत्री चे सुवर्णपदक विजेते खेळाडू (Gold Medalists):

  • वयोगट १९: भक्ती ठोंबरे, प्रगती कड, विराज विशे, साहिल ठाकरे, हर्षद शिंदे, सूरज सिंग, सुशील मांझी, हर्षद चौधरी, मोहित संगनी

  • वयोगट १७: आयुष सिंग, कुशल चौधरी, तसलिम अन्सारी, ऋतुराज आंब्रे, पल्लवी चव्हाण

रौप्य पदक विजेते (Silver Medalists):

  • वयोगट १९: सौमित्र कुलकर्णी, रुद्रा गायकवाड, चैतन्य आढे, सागर सिंग

  • वयोगट १७: अंशिका भारती, अनामिका विश्वकर्मा, विघ्नेश सावरातकर, राजवीर सस्ते

कांस्य पदक विजेता (Bronze Medalist):

  • वयोगट १७: रूद्र पवार

भारोत्तोलन या खेळामध्ये दोन्ही टोकांना वजनदार चकत्या असलेली लोखंडी काठी (बारबेल) डोक्याच्या वर उचलण्याची क्षमता ही मुख्य कसोटी असते. सर्वांत जास्त वजन उचलणारा खेळाडू विजेता ठरतो. या कठीण आणि कौशल्यपूर्ण खेळात गायत्री स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले की शारीरिक ताकदाबरोबरच मानसिक तयारी आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते.

या उल्लेखनीय यशानंतर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. विनायक भोंगाळे साहेब यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याचप्रमाणे संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका माननीय सौ. कविताताई कडू पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत, विपणन अधिकारी मा. श्री शैलेंद्र सिंग, मुख्याध्यापक मा. श्री ज्योतिबा सुरवसे, तसेच सर्व उपमुख्याध्यापक, पालकवर्ग आणि शिक्षकवृंद यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री. समाधान माने, श्री. रविंद्र कालवई व सौ. अश्विनी कागळे यांचे विशेष कौतुक केले. गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूलने शालेय स्तरावर उत्तम प्रशिक्षण व योग्य मार्गदर्शनामुळे खेळाडू घडविण्याचे जे कार्य केले आहे, त्याचे समाजातही सकारात्मक पडसाद उमटत आहेत. या यशाने भविष्यातील राज्य व राष्ट्रीय स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना अधिक आत्मविश्वास मिळेल, असे मत क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button