गंगा पूजन आणि नदी घाट स्वच्छता अभियान अहिल्यादेवींच्या विचारांचे प्रतिबिंब : शत्रुघ्न काटे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भाजपातर्फे उपक्रम

पिंपरी-चिंचवड : “राजमाता अहिल्यादेवींनी केवळ मंदिरे बांधली नाहीत, तर त्यांनी नद्या आणि जलस्रोतांच्या पवित्रतेचे महत्त्वही जाणले होते. गंगा पूजन आणि नदी घाट स्वच्छता अभियान हे त्यांच्याच विचारांचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या ३०० व्या जयंती वर्षात आपण त्यांच्या कार्याची आठवण करून, त्यांचे आदर्श समाजात रुजवण्यासाठी कटिबद्ध आहोत.” असे मत भाजपाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड शहरात भाजपतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पिंपळे सौदागर, जुनी सांगवी आणि काळेवाडी येथे ‘गंगा पूजन’ आणि ‘नदी घाट स्वच्छता अभियान’ राबवून अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी आणि धार्मिक कार्याला स्मरण करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, कार्यक्रमाचे संयोजक विजय उर्फ शीतल शिंदे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, गोरक्षनाथ झोळ, मनोज ब्राह्मणकर, संजय भिसे, कुंदाताई भिसे, संदीप काटे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर धर्म आणि समाजसेवेला प्राधान्य दिले होते. त्यांनी केवळ अनेक शिवमंदिरांची निर्मिती केली नाही, तर भारतभरातील विविध नद्यांच्या घाटांचे बांधकाम आणि दुरुस्ती करून जलस्रोतांच्या संवर्धनाचेही मोठे कार्य केले. त्यांच्या याच विचाराने प्रेरित होऊन, पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात महाआरती कार्यक्रमासोबतच गंगा पूजन आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमात भाविकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. नदीची पवित्रता जपण्याचा आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. महाआरतीनंतर झालेल्या गंगा पूजनामुळे धार्मिक वातावरण निर्माण झाले, तर नदी घाट स्वच्छता अभियानामुळे परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला.
यावेळी बोलताना, भाजपा मंडल अध्यक्ष (सांगवी पिंपळे गुरव) गणेश ढोरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. हा उपक्रम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजसेवेच्या कार्याला आदरांजली म्हणून आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा – PCMC: सुधारित विकास आराखड्यात पूररेषेत मोठ्याप्रमाणात हेराफेरी!
जुनी सांगवी येथील स्वच्छता अभियान
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश भाजपा आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने, जुनी सांगवी येथील ग्रामदैवत वेताळ महाराज मंदिर आणि वेताळ महाराज गणेश विसर्जन घाटावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा, सांगवी पिंपळे गुरव मंडलातील अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये नगरसेवक संतोष कांबळे, मंडल उपाध्यक्ष युवराज ढोरे, भाजपा चिटणीस हिरेन सोनवणे, सिनेट सदस्य कृष्णाजी भंडलकर, बूथ प्रमुख योगेश मोहरे, प्रदीप झांजुर्णे, अमित गवळी, विनायक शिंदे, भाजपा अहिल्याबाई होळकर समिती सदस्य परेश नरूटे, योगेश पाटील, अभिजीत बागुल, ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य सुभाष जाधव, मनपा आरोग्य कर्मचारी नाना शितोळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा समावेश होता.
काळेवाडी येथील स्वच्छता अभियान व पूजन
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नेतृत्त्वात आणि चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी चिंचवड – काळेवाडी मंडलाच्या वतीने ‘काळेवाडी गणेश विसर्जन घाट स्वच्छता अभियान व पूजन आणि पवनामाईची आरती’ असा उपक्रम राबविण्यात आला.
या स्वच्छता अभियान उपक्रमात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, प्रमोद ताम्हणकर, काळेवाडी भागातील पक्षाचे जेष्ठ नेते धर्माजी पवार, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, माजी प्रभाग सदस्य विठ्ठल भोईर, विनोद तापकीर, भाजयुमोचे शहर सरचिटणीस शिवम डांगे, भाजपा पदाधिकारी प्रमोद येवले, पंकज मिश्रा, गणेश गावडे, विकास साठे, हर्ष ढवळे यांसह चिंचवड – काळेवाडी मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपा चिंचवड – काळेवाडी मंडलाचे अध्यक्ष हर्षद नढे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या सर्व कार्यक्रमांमुळे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या कार्याला योग्य प्रकारे आदरांजली वाहण्यात आली.