Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अल्पशिक्षितांपासून उच्चशिक्षित ‘कारभारी’

शहरवासीयांना नगरसेवकांकडून चांगल्या कामाची अपेक्षा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत 12 वी पसून अभियंते, तज्ञ

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये निवडून आलेल्या १२८ नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये चौथी ते सातवीपर्यंत शिकलेले नऊ, आठवी ते नववीपर्यंत शिक्षण घेतलेले २२ नगरसेवक आहेत. दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले सर्वाधिक ५८ नगरसेवक आहेत. काही नगरसेवक पदवीधर, डॉक्टर, वकील, अभियंते आहेत.

महापालिकेमध्ये भाजपचे सर्वाधिक ८४, राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) पक्षाचे ३७, शिवसेना (शिंदे) पक्षाचे सहा आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या १२८ नगरसेवकांच्या शैक्षणिक पात्रतेची आकडेवारी पाहिली असता, महापालिका सभागृह हे शिक्षणाच्या विविध स्तरांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ ठरले आहे.

उच्चशिक्षित नगरसेवकांचाही महापालिकेच्या सभागृहात लक्षणीय सहभाग आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी अशा पदवीधर नगरसेवकांची संख्या ३३ आहे. याशिवाय एमए, एमकॉम, एमएस्सी, एमबीए सारखे पदव्युत्तर पदवी घेतलेले सहा नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेच्या सभागृहात डॉक्टर, वकील, अभियंते आणि शिक्षकही असणार आहेत. त्यामुळे आरोग्य, कायदा, शिक्षण आणि विकासकामांबाबत महापालिका सभागृहात अभ्यासपूर्ण चर्चा होऊ शकेल.

हेही वाचा –विविध राज्यातील माध्यमकर्मीना ‘‘वेस्ट टू एनर्जी’’ ची भुरळ!

अभियंते, वकील, डॉक्टर सभागृहात

चाैथी ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले नऊ, आठवी व नववीपर्यंत शिक्षण झालेले २२, दहावी उत्तीर्ण असलेले २५, अकरावी व बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले ३३ नगरसेवक आहेत. ३३ पदवीधर असून सहा जणांनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यामध्ये चार अभियंते, तीन शिक्षक, दोन वकील आणि एक डॉक्टरही महापालिका सभागृहात असणार आहेत.

कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक

महापालिका निवडणुकीत भाजपची दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आली आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा पराभव केला. भाजपच्या चारही आमदारांनी यशस्वी रणनिती अवलंबून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात केली. भाजपचे सर्वाधिक ८४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ ३७ नगरसेवक निवडून आले. शिवसेना (शिंदे) पक्षाचे सहा आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.

चार वर्षांपासून बंद असलेली पदाधिकाऱ्यांची दालने खुली!

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपून चार वर्षांनी नगरसेवकांच्या हाती कारभार जाणार आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापाैर निवड हाेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने चार वर्षांपासून बंद असलेली पदाधिकाऱ्यांची दालने खुली केली असून सज्ज करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. दालने, महासभेचे सभागृह स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.

अधिकाऱ्यांसाठी दालनाची शाेधाशाेध!

सत्तारुढ पक्षनेत्याच्या दालनात उपायुक्त अण्णा बोदडे, क्रीडा समिती सभापतीच्या दालनात उपायुक्त संदीप खाेत, विराेधी पक्षनेत्याच्या दालनातून सहायक आयुक्त अतुल पाटील आणि विधी समिती सभापतीच्या दालनातून विशेष अधिकारी किरण गायकवाड कामकाज करत हाेते. त्यांच्यासाठी आता नवीन दालनांची व्यवस्था करावी लागणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button