पिंपरी / चिंचवड

क्यू आर कोड स्कॅन करण्यास सांगत ज्येष्ठ नागरिकाची चार लाखांची फसवणूक

घरातील साहित्य ओएलएक्सवर विकणे पडले महागात

पिंपरी l प्रतिनिधी

ओएलएक्स वरील साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाला तीन लाख 92 हजार 856 रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार सोमवारी (दि. 14) रहाटणी पिंपळे सौदागर येथे घडला.

विनयकुमार ताराचंद सूद (वय 65, रा. रहाटणी, पिंपळे सौदागर) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या घरातील टीव्ही कॅबिनेट हे 9 हजार 500 रुपये किमतीला विकण्याबाबत ओएलएक्स साईटवर ऑनलाईन जाहिरात दिली होती. त्यानुसार अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांच्याशी ऑनलाइन माध्यमातून संपर्क साधला. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना क्यूआर कोड शेअर करत त्यांच्या एचडीएफसी बँक खात्यातून 92 हजार 331 रुपये आणि आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून तीन लाख 525 रुपये असे एकूण 3 लाख 92 हजार 856 रुपये ट्रान्सफर करून घेत त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button