पिंपरी / चिंचवड

जबरदस्तीने धनादेश लिहून घेतल्या प्रकरणी चौघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

बाणेर येथील एका कंपनीच्या कार्यालयात घुसून पाच जणांनी मिळून कंपनीची बदनामी करण्याची अथवा नुकसान करण्याची भीती घालून व्यावसायिकाकडून 90 हजार रुपयांचा धनादेश जबरदस्तीने लिहून घेतला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 16) दुपारी घडली.

संदीप उर्फ नाना विठ्ठल गायकवाड (वय 41, रा. केशवनगर, मुंढवा), किशोर मोहन वाघमारे (वय 49, रा. गंजपेठ, पुणे), सनी मंत्री अवघडे (वय 39, रा. गंजपेठ पुणे), अन्वर हुसेन शेख (वय 40, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड पुणे), आदित्य राजू गायकवाड (वय 32, रा. केशवनगर, मुंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मनीष श्रीहर्ष मिश्रा (वय 45, रा. च-होली, पुणे. मूळ रा. ठाणे वेस्ट) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चार ते पाच वाजताच्या कालावधीत आरोपी बाणेर येथील फिर्यादी यांच्या आयटीईएस प्रा ली या कंपनीत आहे. कंपनीच्या कार्यालयात येऊन कंपनीची बदनामी करण्याची अथवा कंपनीस नुकसान करण्याची भीती घालून फिर्यादी यांची इच्छा नसताना कंपनीच्या बँक खात्याचा 90 हजारांचा धनादेश जबरदस्तीने लिहून घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button