breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली कुदळवाडीत इच्छुकांच्या सौभाग्यवती देखील निवडणूक रणांगणात

  •  स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्या सौभाग्यवती निशा यादव यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर

पिंपरी | प्रतिनिधी

चिखली कुदळवाडी परिसरात स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव अनेक सामाजिक कामाच्या माध्यमातून सक्रिय आहेत. सातत्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवून ते चर्चेत असतात. सध्या त्यांच्या सौभाग्यवती देखील सामाजिक कामाच्या माध्यमातुन मैदानात उतरल्याचे दिसते. निशा दिनेश यादव यांच्या पुढाकाराने कुदळवाडीत गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे चिखली कुदळवादीत राजकीय चर्चा रंगल्या आहेत.

गुणवंत विद्यार्थी सत्कार वेळी स्विकृत सदस्य दिनेश यादव, काका शेळके, रामकृष्ण लांडगे, विलास यादव, शरद गोरे, विकास भोसले, दीपक घन, प्रकाश चौधरी, पोपट माने, संगभोर सर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
वैशाली यादव, वसुधा यादव, सुमय्या मुजावर, गौरी यादव, मेघा यादव, अजीता यादव, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

सध्या प्रभाग एकचा की दोनचा सदस्यांचा याची चर्चा सुरू आहे. दोन सदस्यांचा प्रभाग झाल्यास महिलांना 50 टक्के आरक्षणानुसार एका प्रभागात एक महिला निवडणुकीच्या रणांगणात असणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपल्याबरोबरच आपल्या सौभाग्यवतींना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. चिखली कुदळवाडी विकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी त्यांच्या सौभाग्यवती निशा यादव यांना सामाजिक कामाच्या माध्यमातून समोर आणल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button