ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी आमदार विलास लांडेंकडून अजित गव्हाणे यांना ‘‘चेकमेट’’

गुरुपौर्णिमा दिवशीच गव्हाणेंना मिळाली गुरुदक्षिणा

पिंपरी :  ‘अजितदादांनी शहरातील माझ्यासह अनेकांना पद देऊन मोठं केलं. मात्र दादा तुमच्या पुढं पुढं करणारे मोठे होऊन, तुम्हाला सोडून जातात. याची मला खंत आहे. दादा आता तुम्ही कडक शब्दात त्यांना समज द्या. ज्याला थांबायचं त्याने थांबावं नसेल तर सोडून जावं, असं म्हणत अजित गव्हाणे आणि टीमवर माजी आमदार विलास लांडे यांनी जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, ‘‘विलास लांडेंच्या मार्गदर्शनाने मी शरद पवार गटात गेल्याचा दावा गव्हाणेंनी केला होता’’ तो फोल ठरला आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघात ‘‘नवा झोल’’ होणार, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला काही दिवसांपुर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये मोठं खिंडार पडलं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या अनेक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी शरद पवारांच्या उपस्थितीत (Sharad Pawar) पक्षात प्रवेश केला. यामध्ये माजी आमदार विलास लांडेंचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंचा देखील समावेश होता. त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशानंतर गुरू विलास लांडेंनी तुतारी फुंकणाऱ्या कट्टर समर्थक अजित गव्हाणेंना लक्ष केलं आहे.

गुरु-शिष्यांमध्ये राजकीय संघर्ष…
राजकीय क्षेत्रात विलास लांडे हे अजित गव्हाणे यांचे गुरू आहेत, अशी ओळख आहे. किंबहुना, लांडे यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसारच आजपर्यंत गव्हाणे यांनी राजकीय वाटचाल यशस्वी केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा जागी झाल्यामुळे गुरू-शिष्यांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे. गव्हाणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला असला, तरी त्यांना विधानसभेचे तिकीट मिळेल, याची अद्याप ‘गॅरंटी’ दिसत नाही. कारण, या मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. शिवसेनेच्या सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनीही भोसरी शिवसेना ‘मशाल’ला सोडावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. अजित गव्हाणे यांचे बलस्थान असलेले माजी आमदार विलास लांडे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे गव्हाणे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button