breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर, ३० टक्के काम पूर्ण

पिंपरी : पिंपरी डेअरी फार्म येथे मुंबई पुणे रेल्वे मार्गावर फाटक अस्तित्वात आहे. यामुळे पिंपरी गावातून निगडी दापोडी रस्त्यावर नागरिकांना विनाअडथळा वाहतुक शक्य होत नाही. तसेच मुंबई पुणे रेल्वे महामार्ग हा प्रस्तावित फ्राईट कॉरिडोर असल्याने रेल्वे खात्याला या मार्गावरील येणारे सर्व क्रॉसिंग बंद करणे अपेक्षित आहे. यासाठी रेल्वे आणि स्थानिक संस्था निम्मा खर्च करणेस तयार असल्याने नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मागणीचा विचार करून मुंबई पुणे रेल्वे मार्गावर पिंपरी डेअरी फार्म येथे रेल्वे मार्गावर पुल बांधणेचे काम प्रगतपथावर आहे.

या कामांतर्गत एकूण १० पिअर उभारण्यात येणार असून त्यापैकी ७ पिअरचे काम पिअर कॅपसह पुर्ण झालेले आहे. ८ व्या पिअरचे फुटींगचे काम झालेले असून पिअर कॉलमचे काम सुरू आहे. पिअर ९ व पिअर १० मधील स्लॅबच्या कामासाठी आवश्यक स्कॅफोल्डींग उभारण्यात आलेली असून लोखंडी सळई बांधणेचे काम चालू आहे. तसेच उर्वरित दोन पिअर व त्यामधील ४५ मी. लांबीचा रेल्वे लाईन वरील उड्डाण पुलाचे अंतिम रेखांकन रेल्वे विभागाकडे मंजूरीसाठी पुन:श्च पाठवण्यात आलेले असून मंजूरी मिळ्याल्यानंतर सदर कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. आज रोजी सुमारे ३० % काम झालेले असून पुढील काम प्रगतीपथावर आहे.

हेही वाचा  –  टी-२० महामुकाबला! भारत आणि दक्षिण आफ्रिकेत तगडी लढत, जाणून घ्या सर्व माहिती

सदर कामाची संक्षिप्त माहिती..

निविदा रक्क्म – र. रू. ५८.५७ कोटी

स्विकृत निविदा रक्कम – र. रू. ६५.२८ कोटी

कामाचे आदेश दि.- ३१/०३/२०२३.

कामाची मुदत – २४ महिने.

ठेकेदाराचे नांव – मे. टि. अँड टी इन्फ्रा लि. पुणे.

त्यामध्ये ५६५ मी. लांब व १७.२० मी. रूंद असा चार पदरी उड्डाण पुल आणि मुंबई पुणे रस्त्यापासून पॉवर हाऊस चौक पिंपरी पर्यंत १३०० मी. लांबीचा व १८ मी. रूंदीचा रस्ता करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पामुळे पुणे शहरातून पिंपरी गावात जाणेसाठी व पिंपरी गावाकडून पुणे शहरात जाणेसाठी नागरीकांना विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे. यामुळे  नागरीकांच्या वेळेचा व इंधनाचा होणारा अपव्यय टळणार आहे. तसेच नागरिकांना लवकरात लवकर पिंपरी गांव, रहाटणी, पिंपळे सौदागर इ. ठिकाणी पोहचण्यासाठी पर्याय उपलब्ध होणार आहे.

“मनपाने पुलाच्या कामासाठी संरक्षण विभागाकडून ५.९६ एकर जागा ताब्यात घेतली असून त्यापोटी २३.८५ कोटी अदा केलेले आहे.जानेवारी २०२२ मध्ये रेल्वे लाईनवरील उड्डाण पुलाचे रेखांकनास मंजूरी घेवून निविदा काढण्यात आलेली आहे.या कामामुळे पिपंरी गाव पिंपळे सौदागर रहाटणी परिसरातील नागरिकांचा प्रवास जलद होणार आहे.”

– श्रीकांत सवणे, मुख्य अभियंता, पिपंरी चिंचवड मनपा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button