breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार ‘‘ऑन फिल्ड’’ : पूर परिस्थितीची केली पाहणी

पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाची संघटनात्मक मोर्चेबांधणी

पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहरातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी आढावा घेतला. गेल्या काही तासांपासून पिंपरी- चिंचवड सह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला पूर आलेला आहे. नदीचे पाणी अनेकांच्या घरात शिरलं आहे. या कुटुंबाशी पार्थ पवार यांनी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली.

हेही वाचा –  इंद्रायणी नदी काठच्या नागरिकांचे ‘सुरक्षितस्थळी स्थलांतर’

यावेळी आमदार आण्णा बनसोडे, माजी महापौर मंगला कदम आणि युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी- चिंचवड सह लोणावळा आणि मावळ परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस झाला आहे. पवना धरणातून आठ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळेच पिंपरी- चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पवना नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी काठच्या घरात पाणी शिरल आहे. याचा आढावा पार्थ पवार यांनी घेतला.

संघटनात्मक मोर्चेबांधणी…

राष्ट्रवादी काँग्रेसमधील शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह मोठा गट शरद पवार गटात दाखल झाला. त्यामुळे पक्षाची संघटना कमकुवत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यापार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी सर्व सेलचे अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ‘‘वन टू वन’’ चर्चा केली. आमदार आण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात सुमारे ४ तास पार्थ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि समस्या जाणून घेतल्या आहेत. लवकरच शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सक्षम पदाधिकाऱ्याकडे सोपवली जाईल, असे सांगितले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शहरात संघटन मजबूत करण्यासाठी पार्थ पवार यांनी पुढाकार घेतल्याचे पहायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button