पिंपरी / चिंचवड
विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Women-Harrasment-Bhosari.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
घरगुती कारणांवरून विवाहीतेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै 2010 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत जळगाव आणि काळेवाडी पुणे येथे घडली.
पती विकास शांताराम कुंकलहरे, सासरे शांताराम माणिक कुंकलहरे, दीर चेतन शांताराम कुंकलहरे, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती विकास, सासरे, सासू, दीर आणीई नणंद यांनी संगनमत करून फिर्यादी यांना वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच फिर्यादी यांना क्रूर वागणूक देऊन त्यांचा छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.