Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘पहिले पाऊल’ : माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले!

पिंपळे सौदागर येथे ‘प्राथमिक शाळा क्र. ५१’ मध्ये स्वागत समारंभ आणि ‘पहिले पाऊल’ कार्यक्रम उत्साहात

पिंपरी-चिंचवड : “नवे वर्ग, नवे मित्र आणि नवीन स्वप्नं… शाळेचा पहिला दिवस खासच असतो!” या संकल्पनेतून माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.

आज नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून, पिंपळे सौदागर येथील प्राथमिक शाळा क्रमांक ५१ मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘पहिले पाऊल’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले.

हेही वाचा –  राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित गव्हाणे अन्‌ संधीसाधुंची हकालपट्टी !

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर श्री. काटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य किट आणि गणवेशांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला पालिकेच्या संगणक विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता नीलकंठ पोमन, मुख्याध्यापिका सुरेखा गेंगजे , बालवाडीच्या पर्यवेक्षिका मा. खंडागळे मॅडम, आकांक्षा फाउंडेशनचे सदस्य, उद्योजक सोमनाथ खेडेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात आनंददायी व प्रेरणादायी झाली असून, शाळेच्या पहिल्या दिवसाला एक वेगळं व उत्साहवर्धक स्वरूप लाभले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नव्या स्वप्नांना पंख देणारा असतो. शिक्षण हे केवळ ज्ञान देणारे नसून, व्यक्तिमत्त्व घडवणारे आहे. आज येथे ‘पहिले पाऊल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून मन आनंदित झाले. या लहानग्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. शाळा ही केवळ इमारत नसून ती संस्कारांची कार्यशाळा आहे. या पिढीला योग्य दिशा देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

– विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी विरोधी पक्षनेता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button