TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला पहिला झटका; वसंत बोराटे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा
![First blow to BJP in Pimpri Chinchwad; Vasant Borate resigns as corporator](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220216-WA0000.jpg)
पिंपरी | पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला भोसरीत पहिला झटका बसला आहे. शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक नगरसेवकाने पदाचा राजीनामा दिला आहे.प्रभाग क्रमांक २ मोशी-जाधववाडी भागाचे प्रतिनिधित्व करणारे वसंत बोराटे यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.
प्रभागाच्या विकासासाठी सहकार्य केले नाही आणि पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता, असे सांगत वसंत बोराटे यांनी आज बुधवारी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपला पहिला झटका बसला आहे.