Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
Fire in Garage: चिंचवड- केशवनगरमधील गॅरेजला आग; १५ वाहने खाक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/4-2.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
चिंचवड येथील केशवनगरमध्ये गॅरेजला मंगळवारी (दि. 3) रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली 15 वाहने जळून खाक झाली आहेत. अचानक लागलेल्या आगीवर दोन तासानंतर नियंत्रण मिळवले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या वतीने कळवली आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडकडून काळेवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ‘मदिना’ नावाने चारचाकी वाहनांचे गॅरेज आहे. मंगळवारी रात्री अचानक गॅरेजमध्ये आग लागली. काही वेळेत आगीचा भडका उडाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. गॅरेजच्या जवळ फळांचे गोदाम आहे. हे गोदाम देखील जळून खाक झाले आहे. आगीत 15 वाहने जळाली आहेत, असेही संबंधित अधिकारी म्हणाले. चिंचवड पोलिस पुढील तपास करीत आहेत.