अनधिकृत फ्लेक्स प्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोघांवर गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/GANG-ARREST-696x447-1.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे पोलिसांची तसेच महापालिकेची परवानगी न घेता दोघांनी अनधिकृतपणे फ्लेक्स लावला. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 मार्च रोजी दुपारी घडली.
महेश डोंगर, सुनील चव्हाण (दोघे रा. दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. महेश डोंगर हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार दत्तात्रय कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पोलीस आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे चक्रपाणी वसाहत भोसरी येथे फ्लेक्स लावला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत फ्लेक्स लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींनी फ्लेक्स लावून सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.