पिंपरी / चिंचवड

पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

– परस्पर विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

बौद्ध नगर, पिंपरी येथे पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शनिवारी (दि. 22) सकाळी घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संतोष कुंडलिक घोडके (वय 43, रा. बौद्ध नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सत्यशोधक अशोक कांबळे (वय 40), प्रतीक संगमेश्वर साबळे (वय 23), यश अशोक सूर्यवंशी (वय 21), आयुष सुमित कांबळे (वय 22, सर्व रा. बौद्ध नगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची बहीण आणि आरोपी सत्यशोधक कांबळे यांच्यात पाणी भरण्यावरून वाद झाला. तो वाद सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपींनी सिमेंटचा गट्टू फिर्यादी यांच्या कपाळावर मारून जखमी केले. तसेच फिर्यादीचा भाचा अक्षय व अनिकेत यांनाही आरोपींनी मारहाण केली. फिर्यादीच्या बहिणीचा हात पिरगाळून तिला शिवीगाळ केली. तुम्ही यापुढे या बिल्डिंगमध्ये कसे राहता तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी आरोपींनी दिली.

याच्या परस्पर विरोधात सत्यशोधक शिवमूर्ती कांबळे (वय 34, रा. बौद्ध नगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण पंडित फडतरे (वय 50), अक्षय फडतरे (वय 26), अनिकेत फडतरे (वय 24), संतोष (वय 35, सर्व रा. बौद्ध नगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाचा बौद्ध नगर येथील गल्लीमध्ये उभा असल्याच्या कारणावरून त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादीने समजावून सांगितले. त्यावरून आरोपींनी फिर्यादी व इतरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अक्षय फडतरे याने सिमेंटच्या गट्टूने फिर्यादी व इतरांना मारहाण करून जखमी केले. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button