breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडलेख

लढा कोरोनाविरुद्धचा : कोविड काळातील ‘आरोग्यदूत’ आमदार महेश लांडगे !

पिंपरी-चिंचवडमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी धडपड

विविध उपक्रमांतून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
कामगार, कष्टकरी आणि चाकरमान्यांचे शहर अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाच्या महामारीने थैमान घातले. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. अशा परिस्थितीत लोकांना दिलासा देण्यासाठी ‘शहराचा कारभारी’ म्हणून आमदार महेश लांडगे ‘आरोग्य दूत’ होवून लोकांची सेवा करीत आहेत.
महेश लांडगे…भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहेत. त्याचबरोबर भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे मतदार संघात काम करीत असताना संपूर्ण पिंपरी-चिंचवडसाठी आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी आमदार लांडगे यांच्यावर आहे. ही जबाबदारी पेलत असताना येणाऱ्या अनेक अडचणींवर मात करीत आमदार लांडगे यांनी शहरातील कुशल नेतृत्त्व असल्याचे सिद्ध केले आहे.
कोरोनाची पहिली लाट, त्यानंतर दुसरी लाट ही अनेक पिंपरी-चिंचवडकरांच्या जीवावर बेतली. आता तिसरी लाट अधिक जीवघेणी असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत
*
अन्नदान- जीवनाश्यक वस्तूंचे वाटप…
कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाउन करण्यात आले. चाकरमानी- कष्टकरी नागरिकांची उपासमार होण्याची स्थिती होती. त्यावेळी आमदार लांडगे यांनी अन्नदान, जीवनाश्यक वस्तुंचे किट वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला. कम्युनिटी किचन सुविधा सुरू करुन सर्वसामान्यांना मोफत जेवण सुविधा दिली. विशेष म्हणजे, त्या काळात राज्याबाहेरील नेत्यांनी आमदार लांडगे यांच्याशी संपर्क करुन त्या-त्या राज्यातील लोकांना मदत करण्याची विनंती केली होती. त्यावेळी आमदार लांडगेंनी सर्वोतोपरी मदत करीत मानवता धर्माचा आदर्श घालून दिला.
*
मास्क फॉर पिंपरी-चिंचवडकर…
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क वापरासह नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत आमदार लांडगे यांनी जनजागृती केली. त्याला पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, पहिल्या लाटेत जनमानसात उतरून काम करणारे आमदार लांडगे स्वत: कोरोनाबाधित झाले. रुग्णालयात असतानाच सुरू केलेली ‘मास्क फॉर पीसीएमसी’ ही मोहीम अल्पावधित शहरातील घराघरांत पोहोचली.
*
प्लाझ्मा दान करा…दोन जीव वाचवा…
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी यशस्वी होत आहे. हे लक्षात आल्यानंतर शहरातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी आमदार लांडगे यांनी प्लाझ्मादान मोहीम हाती घेतली. ‘प्लाझ्मा दान करा… दोन जीव वाचवा’ असा संदेश देत स्वत: प्लाझ्मा दान करुन तरुणांना आवाहन केले. त्यामुळे आजही ‘टीम लांडगे’ रुग्णांच्या नातेवाईकांना प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असते.
*
कोविड हेल्प डेस्क…
कोरोना बाधित रुग्ण आणि नातेवाईंना रुग्णालय व्यवस्थापनाशी जोडणारा एक दुवा असावा म्हणून आमदार लांडगे यांनी कोविड हेल्प डेस्क सुरू केला. त्याद्वारे रुग्णालांना बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, प्लाझ्मा, रेमडेसिवीर इंजेक्शनसह वैद्यकीय सहायता केली जाते. आज शहरातील शेकडो रुग्णांसह नातेवाईकांना या सुविधेची मदत होत आहे. विशेष म्हणजे, रुग्ण दाखल करण्यापासून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यापर्यंतची मदत करण्यासाठी ‘टीम लांडगे’ सज्ज आहे.
*
आम्ही पिंपरी-चिंचवडकर; एकजुटीने लढणार…
कोविड-१९ काळात पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा देण्यासाठी राजकीय मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवून एकजुटीने संकटाचा समाना करायला हवा, असा विचार आमदार लांडगे यांनी पुढे आणला. त्याद्वारे शहरातील सर्व कोविड केअर सेंटर, महापालिका रुग्णालये आणि आरोग्य व्यवस्था सक्षम करीत असतानाच सर्वस्तरावरील पिंपरी-चिंचवडकरांचे मनोबल वाढण्याची भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली आहे.
*
पिंपरी-चिंचवडकरांना मोफत लस…
कोरोनाच्या महामारीतून सर्वसामान्य नागरिकांचा बचाव व्हावा. याकरिता राज्य सरकारने मोफत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्याची भूमिका घेतली. तत्पूर्वी, पिंपरी-चिंचवड स्थायी समिती सभेने पिंपरी-चिंचवडकरांना मोफत लस देण्याबाबत निर्णय घेतला होता. आता महापौर माई ढोरे यांच्या वतीने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. उत्पादक कंपनीकडून थेट १५ लाख डोस लस खरेदी करण्याबाबत राज्य सरकारची परवानगीची प्रतीक्षा आहे.
*
ऑक्सिजन निर्मितीला चालना…
कोरोनाची वाढती संख्या आणि ऑक्सिजन बेडची मागणी यासह ऑक्सिजनची कमतरता यावर मात करण्यासाठी औद्योगिक पट्टयांमधील ऑक्सिजन निर्मिती प्लँटला आमदार लांडगे यांनी भेट दिली. त्याद्वारे शहराला ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवता येईल? याचे नियोजन करण्यात आले. यासह महापालिका प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठी आणखी ४ नवीन ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button