पिंपरी / चिंचवड
अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणा-या बापास अटक
पिंपरी l प्रतिनिधी
स्वतःच्या 15 वर्षीय मुलीचा बापाने लैंगिक छळ केला. हा प्रकार 9 ते 24 डिसेंबर या कालावधीत वाल्हेकरवाडी येथे घडला.
चिंचवड पोलिसांनी 43 वर्षीय बापाला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित 15 वर्षीय मुलीच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाप हा मजुरी काम करतो. त्याने त्याच्या पोटच्या 15 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केला. मुलीने आईला हा प्रकार सांगितल्यानंतर आईने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.