एक्झर्बिया अॅबोडमध्ये ‘मावळचं काळीज – सुनील अण्णा’ माहितीपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते महाआरती; एसव्हीपी प्रतिष्ठानच्या बालकलाकारांनी विकासकामांवर टाकला प्रकाशझोत

मावळ : एक्झर्बिया अॅबोड गणेशोत्सव मंडळ 2025 च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘मावळचं काळीज – सुनील अण्णा’ माहितीपटाचे सादरीकरण उत्साहात पार पडले. आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते श्रींची महाआरती पार पडली. यावेळी एसव्हीपी प्रतिष्ठानच्या बालकलाकारांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणातून आमदारांच्या विकास कार्यावर प्रकाशझोत टाकत उपस्थितांची मने जिंकली.
मंडळाचे अध्यक्ष अनंत भानुदास गुळवे यांनी आमदार सुनील शेळके यांचा पुष्पगुच्छ व विठ्ठल-रखुमाई मूर्ती देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार व पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, एक्झर्बिया अॅबोड गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सोमेश्वर काळे, मार्गदर्शक पंढरीनाथ हिंगे, तसेच प्रकाश कांबळे, मोतीराम पखाले, दिनेश सकट, धनंजय वाणी, शुभम काकरे, विवेक काकरे, भानुदास जांभुळकर, सुधांशु अनेचा आदी मान्यवरांसह एक्झर्बिया अॅबोड संकुलाती सर्व रहिवाशी प्रामुख्याने उपस्थित होते.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
महाराष्ट्र राज्य पत्रकार, मुंबई संलग्न मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सचिन ठाकर, वडगाव शहराध्यक्ष महादेव वाघमारे, कार्याध्यक्ष गणेश दुडम, सचिव संतोष थिटे, उपाध्यक्ष दिलीप कांबळे, सुनील आढाव, दक्ष काटकर, योगेश घोडके, धनंजय खाडे यांच्यासह अनेक पत्रकारांनी सहभाग घेतला.
मावळचं काळीज सुनील अण्णा माहितीपटात ‘बदलते मावळ – बदल घडवलाय, मावळ बदललाय’ या संकल्पनेवर आधारित विकास कामांचे सूक्ष्म चित्रण सादर करण्यात आले.
यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले, “या माहितीपटातून जे वास्तव लोकांसमोर आले, त्यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. येत्या काळात प्रगतीपथावरील सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करून मावळचा चेहरा मोहरा नक्कीच बदलणार,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.