Breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

‘युफोरिया वार्षिक स्नेह संमेलन”तून विद्यार्थ्यांमधील प्रतिभेचा जागर!

शिक्षण विश्व: ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पिंपरी- चिंचवड : ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकताच बहुप्रतीक्षित “युफोरिया वार्षिक स्नेह संमेलन” मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांचे सादरीकरण झाले. यातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा जागर पाहायला मिळाला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. कुनाल किसनमहाराज तापकीर यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि दीपप्रज्वलन झाली. यावेळी ॲड तापकीर म्हणाले,  विद्यार्थ्यांनी आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा चिकाटीने आणि समर्पणाने करावा. शिक्षण त्यानंतर करिअर या सर्व गोष्टींमध्ये चिकाटी आणि मेहनत खूप महत्त्वाची आहे.

कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान पदक आणि प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय स्कॉलर्स क्वेस्ट ऑलिम्पियाड मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

हेही वाचा –  ..म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले नाहीत; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक पारितोषिके पटकावली आहेत यामध्ये चौथ्या तायक्वांदो खुल्या स्पर्धेत वरद शिंदे (सुवर्णपदक), श्रावण पवार (सुवर्णपदक), पाचव्या सिंहगड तायक्वांदो ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत वरद शिंदे (सुवर्णपदक), श्रावण पवार (कांस्यपदक) तर पुणे जिल्हास्तरीय आंतरशालेय  तायक्वांदो स्पर्धेत वरद शिंदे (कांस्यपदक), बुद्धिबळ मध्ये अर्जुन ढोकणे (कांस्यपदक), योग स्पर्धेत त्रिदेव जंगम (कांस्यपदक), जोग  महाराज स्पोर्ट्स अकादमी राज्यस्तरीय धावण्याची स्पर्धेमध्ये अद्वैत भूमकर (सुवर्णपदक), स्टेट स्कॉलर्स क्वेस्ट ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये बद्रीनाथ शिंदे, सुयोग कलस्कर (सायकल), शिवांश सुर्यवंशी, अद्वैत बवले (रायटिंग टॅब), आराध्या गाडे (लॅपटॉप) यांनी चमकदार कामगिरी दाखवली.

पारितोषिक वितरणानंतर उपस्थितांना एक सांस्कृतिक महोत्सव पाहण्याचा आनंद मिळाला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांद्वारे आपली प्रतिभा सादर केली. या सादरीकरणामध्ये शास्त्रीय आणि आधुनिक नृत्य, लोकनृत्य, बॉलीवूड नृत्य, नाट्यप्रयोग, भारूड  आणि देशभक्तीपर गीते यांचा समावेश होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button