मनसेच्या रक्तदान शिबिरात तरुणांचा उत्साही सहभाग
पिंपरी / महाईन्यूज
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्राधिकरण विचार मंच निगडी आयोजित भव्य रक्तदान शिबिर रविवारी (दि. 2) पार पडले. कोविड काळात शासनाच्या नियमांचे पालन करून शिबिरात असंख्य मनसैनिकांनी रक्तदान केले.
मनसे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिखले, माजी नगरसेविका अश्विनी चिखले, माजी नगरसेवक बाळासाहेब हिंदळेकर, डॉ. नितीन गांधी, मनसेचे हेमंत डांगे, रुपेश पटेकर, राजू सावळे, विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, अनिकेत प्रभु, सुशांत साळवी, दिशा ग्रुपचे रोहित बंगाळे, शंतनु तेलंग, गणेश काळभोर, मंगेश काळभोर, सुमित काळभोर, निलेश शिवणेकर, सुनीता बंगाळे, आप्पा मोरे, श्रीकांत धावारे, तानाजी जाधव, चिकु मालडदार आदींच्याहस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
शिबिराचे संयोजन बाळा दानवले, स्वाती बाळा दानवले, ओंकार पाटोळे, दिपेश नाईक, प्रसाद मराठे, शंतनु चौधरी, रुषिकेश कांबळे, रोहित शिंदे, गणेश उजैणकर, विठ्ठल कर्डिले, दीपक अहिराव, विशेष सहकार्य गांधी नर्सिंग होमचे डाॅक्टर व सर्व कर्मचारी यांनी केले. संजीवनी ब्लड बँक भोसरी यांनी सहकार्य केले.