अतिक्रमण पथकाची बोऱ्हाडेवाडीतील फुटपाथवरील टप-या, झोपड्या, पत्राशेडवर कारवाई
![Encroachment Squad cracks down on sidewalks, huts, leaf sheds in Borhadewadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/IMG-20220115-WA0006.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ प्रभाग अतिक्रमण पथकाच्या मार्फत बो-हाडेवाडीतील फुटपाथवरील 12 टपऱ्या, मोकळ्या मैदानावरील 42 झोपड्या आणि 32 अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई आज (शनिवारी) केली. या कारवाईत बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, योगेश शेवलकर, राजश्री सातळीकर, अतिक्रमण निरीक्षक ज्ञानेश्वर केळकर, सुपरवायझर पंकज वाघे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक सहभागी झाले होते. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.
नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टप-या व पत्राशेड उभारु नयेत. तसेच फुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 2 मधील बो-हाडेवाडी येथील सीएनजी पम्प ते मोशी भाजी मार्केट रोड लगतच्या फुटपाथवरील 12 टप-या, गोल्ड जीम बो-हाडेवाडी शेजारील मोकळ्या मैदानावरील 42 झोपड्या व 32 अनधिकृत पत्राशेडवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली.