ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

तळेगावमध्ये होणार इलेक्ट्रिक बस निर्मिती, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

पिंपरी चिंचवड | तळेगाव एमआयडीसी येथे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणार सुरू होणार आहे. या नियोजित इलेक्ट्रिक बस उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज (दि.19) सकाळी झाले. इंग्लंडमधील कॉसिस ई-मोबिलिटी ही कंपनी तळेगाव मध्ये 2,800 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, राजेश खांडभोर, शरद हुलावळे, मदन शेडगे, दत्ता भेगडे व कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते.तळेगाव एमएडीसी टप्पा क्र. 05 मधील आंबी मंगरुळ हद्दीतील, 75 एकर क्षेत्रावर हा इलेक्ट्रिक बस उत्पादन प्रकल्प नियोजित आहे. कॉसिस ई-मोबिलिटी कंपनीचा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य करार झाला होता. या प्रकल्पामुळे जवळपास दीड हजार जणांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

शिवजयंतीच्या पवित्र मुहूर्तावर तळेगाव औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या ई बस उत्पादन प्रकल्पाच्या भूमिपूजन उपक्रमास देसाई यांनी शुभेच्छा दिल्या. येत्या एक नोव्हेंबरला तळेगाव प्रकल्पात उत्पादन झालेली ई-बस रस्त्यावर धावेल असे नियोजन असल्याची ग्वाही कंपनी व्यवस्थापनाने यावेळी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button