breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक शुक्रवारी; उमेदवारी अर्ज उद्या दाखल होणार!

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. शुक्रवार (दि.०५) मार्च रोजी ही निवडणुक होणार असून उद्या मंगळवार (दि.०२) रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यामुळे सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे. सभापती पदासाठी भाजपाचे रवी लांडगे, शत्रुघ्न काटे आणि नितीन लांडगे यांच्यात चूरस आहे.

पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या (दि.०२) दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. ०५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

महापालिकेच्या स्थायी समितीत १६ सदस्य आहेत. यात भाजपचे १०, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, शिवसेना १ आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.

भाजपचे नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न नीता पाडाळे, राष्ट्रवादीच्या पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर आणि शिवसेनेच्या मीनल यादव असे १६ सदस्य स्थायी समितीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button