breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कंत्राटी पद्धतीने काम करणारे डॉक्टर, नर्स तीन महिने पगाराविना; कामबंद आंदोलन

पिंपरी : चिंचवड महापालिकेच्या नवीन जिजामाता, नवीन थेरगाव रुग्णालयात  कंत्राटी पद्धतीने काम करणा-या डॉक्टर, स्टाफनर्स यांचा तीन महिन्यांपासून पगार झाला नाही. पगारासाठी ठेकेदाराकडून दररोज वेगवेगळ्या तारखा दिल्या जात असल्याचा आरोप करत डॉक्टर, स्टाफ नर्ससह विविध कर्मचा-यांनी आज (मंगळवारी) सकाळी काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे काही वेळ रुग्णसेवा विस्कळीत झाली होती.

महापालिकेने कोरोनाच्या पहिल्या, दुस-या लाटेत डॉक्टर, स्टाफनर्स यांना मानधनावर घेतले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने सर्वांचा विरोध डावलून विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्यासाठी ठेकेदार नेमले. त्यांच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या रूग्णालयात आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी घेण्यात आले, मात्र या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याची समस्या सुरुवातीपासूनच सुरु झाली. तीन – तीन महिने ठेकेदारांकडून पगार दिला जात नाही.
हक्काच्या कामाचा पगार मिळविण्यासाठी डॉक्टर, नर्स यांना काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे.   त्यानंतर थकित पगार दिला जातो. पुन्हा पगार थकविला जातो. याबाबत कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने  केली. दर तीन महिन्यांनी कर्मचा-यांना पगारासाठी आंदोलन करावे लागते. तरी, देखील परिस्थिती बदलत नाही. कंत्राटी पद्धतीने काम करणा-या डॉक्टर, नर्स यांचा मागील तीन महिन्यांचा पगार झाला नाही. त्यामुळे  नवीन जिजामाता रूग्णालय आणि थेरगाव रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केले. त्यामुळे काही काळ रुग्णसेवेवर परिणाम झाला होता. तीन महिन्याचा थकित पगार त्वरीत देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. ठेकेदाराने आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, ”महापालिका रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या कर्मचा-यांचा तीन महिन्याचा पगार थकला आहे. पगार मिळावा या मागणीसाठी कर्मचारी एकत्र जमले होते. त्यांनी काम बंद केले नव्हते. रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. कर्मचा-यांचा पगार देण्याबाबत ठेकेदार एजन्सीला नोटीस दिली आहे”.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button