ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
वाल्हेकरवाडी येथे शनिवारपासून जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा
![District level weightlifting competition from Saturday at Walhekarwadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-12T164718.063.jpg)
पिंपरी चिंचवड | वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे उद्यापासून (शनिवार, दि.13) रविवारपर्यंत (दि.14) जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्मित वाल्हेकर स्पोर्ट्स अकादमी आणि पुणे जिल्हा वेटलिफ्टींग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली असून, अकादमीच्या प्रांगणात ही स्पर्धा होईल.युवक, कनिष्ठ आणि वरिष्ठ गट (महिला व पुरूष वर्ग) या प्रकारात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. 40 किलो वजनी गट ते खुला गटातील स्पर्धेक सहभागी होऊ शकतात असे आयोजकांनी सांगितले आहे. स्पर्धेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते, यामध्ये 145 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. विजेत्या स्पर्धेकांना पदक व प्रमाणपत्र देऊन स्नमानित करण्यात येणार आहे.