TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडराष्ट्रिय

भाजपा महिला मोर्चा भोसरी-च-होली मंडलातर्फे महिला दिनी “सुषमा स्वराज” पुरस्काराचे वितरण

महिला मोर्चा सरचिटणीस कविता भोंगाळे- कडू यांचा पुढाकार; विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सत्कार

पिंपरी: भाजपा महिला मोर्चा भोसरी च-होली मंडलाच्या वतीने शहरातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांना “सुषमा स्वराज पुरस्कार” देवून गौरविण्यात आले. यंदाचा “महिला दिन” सुषमा स्वराज यांना समर्पित करत भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस कविता भोंगळे- कडू आणि भोसरी च-होली मंडलाध्यक्षा गीता महेंद्रु यांच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.

प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या सूचनेनुसार तसेच भाजपा शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभा आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली “सुषमा स्वराज पुरस्कार” सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ व कार्यक्रम पार पडले.

प्रास्ताविक महिला मोर्चा सरचिटणीस कविता भोंगळे -कडू यांनी केले. त्या म्हणाल्या की, सार्वजनिक जीवनात पुरुषांप्रमाणे महिला देखील आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवित आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ‍महिलांनी आपली क्षमता जगाला दाखवून दिलेली आहे. अशा महिलांना योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने कार्यक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा उज्वला गावडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाला भाजपा कामगार आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा राजश्री जायभाय, पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस दिपाली धनोकार, शहर उपाध्यक्षा रोहिणी मांढरे, उपाध्यक्ष जयश्री खरमाडे, निगडी चिखली मंडलाध्यक्ष कविता हिंगे, सोशल मीडिया प्रमुख हीना मुलानी, भोसरी च-होली मंडल सरचिटणीस सुरेखा पांचाळ, चित्रा अभंग, उपाध्यक्ष कल्पना पाटील, स्वाती शिर्के, मनीषा गंगणे यांच्यासह सर्व मंडल पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष, प्रभाग कार्यकारणी सदस्य आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार भोसरी च-होरी मंडल अध्यक्षा गीता महेंद्रु यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button