breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पार्थ पवार फाऊंडेशनच्या माध्यमातून शेकडो कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तुंच्या किट वाटप

पिंपरी / महाईन्यूज

मावळ तालुक्यातील लोणावळा नजीकच्या बेट्री हिल, ठाकर वस्ती आणि खंडाळा परिसरातील अन्य भागांत पार्थ पवार फाऊंडेशन संस्थेच्या वतीने ३०० कुटुंबांना मोफत राशन किट वाटप करण्यात आले.

हा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष जीवन प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजपाल यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दरम्यान, आमच्या अडचणीच्या काळात राशन उपलब्ध करून दिली. याबद्दल आम्ही पार्थदादा पवार व पार्थ पवार फाऊंडेशन संस्थेचे धन्यवाद मानतो, अशा शब्दांत गावकऱ्यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button