सोसायटीधारकांत नाराजी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांची ‘‘जुमलेबाजी’’!
कार्यवाही शून्य : वाकड दत्त मंदिर रस्त्यासाठी केवळ आश्वासने
![Displeasure among society owners: Pimpri-Chinchwad Municipal Commissioner's "Jumlebaji"!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Society-Federation--780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
वाकड दत्त मंदिर रास्ता रुंदीकरण विषयावर १७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत दिलेली आश्वासने दोन महिन्यांनंतरही पाळली नाहीत. केवळ रस्ता रुंदीकरणासाठी आम्ही आग्रही आहोत, अशी जुमलेबाजी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून केली जात आहे. त्यामुळे परिसरातील सोसायटीधारकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
वाकड दत्तमंदिर रोड रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद आणि रुंदीकरण नावालाच सुरू आहे, अशी स्थिती आहे. याबाबत स्थानिक सोसायटीधारकांनी महापालिका प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. असे असतानाही त्यावर कार्यवाही होत नाही. याबाबत जाब विचारण्यासाठी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवासीयांनी आयुखतांच्या महापालिकेच्या कार्यालयात भेट घेतली. या बैठकीला या रस्त्यावरील अंदाजे १७- १९ गृहनिर्माण संस्थंमधील रहिवासी उपस्थित होते.
या बैठकीच्या समाप्तीनंतर रहिवासीयांनी आपल्या गृहनिर्माण संस्थेकंडील २३ निवेदने आयुक्त कार्यालयाला सादर केले. तसेच हा सर्व पत्र व्यवहार महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय, दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यालय यांना देखील करण्यात आला आहे. शहर विकास व नागरी मंत्रालयाला उचित कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने ई-मेल द्वारे केले आहेत .
वाकड दत्त मंदिर रस्त्यावरील विवादित जागांचा ताबा याबद्दल प्रश्न विचारले असता कायदेशीर प्रक्रिया अजूनही सुरु केली नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली. पालिकेच्या ताब्यात असलेल्या ६०-७० टक्के जागांवर अतिक्रमण असूनही पालिका जाणीवपूर्वक कानाडोळा करत दबावाखाली येऊन अशा जगमालक आणि पत्रशेड चालकांवर कारवाई टाळत आहे, असा आक्षेप रहिवाशांकडून घेतला जात आहे. संबंधित विभागाची उत्तरे ऐकून मग या वेळकाढू आणि वेळेचे बंधन नसलेल्या गेल्या २-३ वर्षांपासून सुरु असलेल्या कंत्राटी प्रक्रियेबद्दल रहिवासीयांनी तीव्र नाराजी आयुक्तांकडे व्यक्त केली. त्यामुळे एकूणच या रस्त्याचा रुंदीकरणाचा विषय आणि त्याचे भविष्य धूसर होण्याची भीती व चीड रहिवासीयांनी या वेळी व्यक्त करून दाखवली.
आढावा बैठक फिस्कटली… सोसायटीधारकांत नाराजी
वाकड रहिवासीयांच्या या काम सुरु असलेल्या रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित पदपथांची रुंदी अरुंद करण्याच्या मागणी केली. तसेच मग या विषयावरील आयुक्तांच्या उत्तरावरून बैठकीत लोकांमध्ये बराच मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला. रुंद पदपथ आणि त्यांना रुंद ठेवण्याच्या पालिकेचे उदिष्ट आयुक्तांनी स्पष्ट केले. परंतु, मग “वाकडमधील अतिउच्च व उच्चभ्रू रहिवासीयांनी आपल्या वातानुकूलित गाडीमधून पदपथांना न बघता त्याला सामान्य नागरिकांच्या तसेच व्यवहार्य नजरेतून पाहण्याची गरज आहे” असे विधान केले आणि मग त्यांच्या या विधानावरून बैठकीत बराच गोंधळ निर्माण होऊन नाराजी व्यक्त झाली. उपस्थित रहिवासीयांनी पदपथावरील हातगाड्या व विक्रेते यांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी लोकांनी लावून धरली. तसेच, आयुक्तांनी बांधकाम पूर्ण झालेल्या पदपथांचा वापर करण्याच्या एकूणच संस्कृतीचा अभाव रहिवासीयांमध्ये असल्याची खंत निर्माण केल्यामुळे एकूणच नाराजी रहिवासीयांनी बैठकीनंतर इतर अधिकाऱ्यांकडे नमूद केली. वाकड रहिवासीयांनी नियमितपणे तेथील प्रभाग कार्यालयात भेट देऊन या व इतर समस्या नोंदवण्याची अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.
निवडणुकीत आता ‘‘नोटा’’…
आढावा बैठकीनंतर वाकडमधील गृहनिर्माण संस्थांच्या उपस्थितांमध्ये नाराजीचा सुरात आणखी तीव्र भर पडली. शहरातील नागरिक म्हणून आपण प्रश्न निर्माण करू नये का? या मुद्यावरून एकूणच आक्षेप वाकड रहिवास्यांनी नोंदवला. येणाऱ्या निवडणुकीदरम्यान नोटा बटन दाबण्याचे किंवा एकूणच मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याची भीती उपस्थित असलेल्या आणि तसेच गृहनिर्माण संस्थामधील इतर सदस्यांनी या आधीच व्यक्त केली होती. त्यामुळे एकूणच दत्त मंदिर रस्त्याच्या ४५ मीटर रुंदीकरण विषयावर किरकोळ, पोकळ आश्वासने ऐकून आणि एकूणच या प्रकल्पाबाबत प्रशासनाची उदासीनता लक्षात आल्याने येणारा काळ हा खडतर असेल असे बैठकीच्या आयोजकांनी व उपस्थितांनी अत्यंत तीव्र भावनेत नाराजी व्यक्त केली आणि महापालिकेला कारभाराचा निषेध केला आहे.