सोशल मीडियावर धुमाकूळ : महेशदादा.. ‘मॅन ऑफ कमिटमेंट’..!
![Dhumakul on social media: Maheshdada .. ‘Man of Commitment’ ..!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/pcmc.jpg)
पिंपरी : “राजकारणात शब्द फिरवणारे अनेक भेटतील, पण शब्द पाळणार एकच.. आपला महेशदादा” मॅन ऑफ कमिटमेंट.. या गौरवोद्गाराने सध्या सोशल मिडीयावर सध्या चांगलाच धुमाकूळ घातला आहे. फेसबुक असो किंवा व्हॉटस्अप ग्रुप नितीन लांडगे यांना दिलेल्या स्थायी समितीच्या उमेदवारीवरून भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यावर समर्थकांकडून जोरदार शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या जोडीने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उध्वस्त केला. भोसरी विधानसभा मतदार संघात महेश लांडगे यांच्या नेतृत्वात भाजपाला घवघवीत यश मिळाले. पहिल्याच वर्षी २०१७ ला महेश लांडगे यांनी चर्होलीच्या नितीन काळजे यांना महापौरपदी संधी दिली. त्यानंतर २०१८ ला चिखली-जाधववाडीच्या राहुल जाधव यांना महापौरपदी विराजमान करून खर्या अर्थाने समाविष्ठ गावांना न्याय मिळवून दिला. त्यानंतर २०२० मध्ये आमदार लांडगे यांनी त्यांचे समर्थक संतोष लोंढे यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी वर्णी लावत ओबीसी समाजाला दिलेली वचनपूर्ती पूर्ण केली.
आता महापालिकेच्या पंचवार्षिकचे हे शेवटचे वर्ष आहे. पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. त्याच अनुषंगाने महेश लांडगे यांनी दिलेला ‘शब्द’ पाळत भोसरीतील नितीन लांडगे यांना स्थायीची उमेदवारी मिळवून दिलीयं. नितीन लांडगे हे प्रथम महापौर तथा माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे पुत्र आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग शहरात आहे. स्थानिक नात्यागोत्यातही ज्ञानेश्वर लांडगे यांना मानाचे स्थान आहे. नितीन लांडगे यांना स्थायी समितीचे सभापतीपद देऊन महेश लांडगे यांनी शब्द तर पाळलाच, परंतू राजकीय पटलावरील पैलवान आपणच असल्याचे सिध्द केले आहे.
महेश लांडगे यांच्या या वचनपूर्तीची सध्या पिंपरी चिंचवड शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. “राजकारणात शब्द फिरवणारे अनेक भेटतील, पण शब्द पाळणार एकच.. आपला महेशदादा”.. ‘मॅन ऑफ कमिटमेंट’ ही पदवी कार्यकर्त्यांकडून त्यांना बहाल करण्यात आली आहे.