पिंपरी चिंचवड शहरात धुळवड उत्साहात साजरी
![Dhulwad celebrations in Pimpri Chinchwad city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/pjimage-2022-03-18T162906.487.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड शहरात धुळवड उत्साहात साजरी करण्यात आली. रंगांची उधळण करत एकमेकांना शुभेच्छा देत पिंपरी चिंचवडकरांनी धुळवड साजरी केली. प्लास्टिक पिशव्यांचे फुगे, रंग आणि पाणी टाकून सर्वांनी आनंदाने हा सण साजरा केला.
पिंपळे सौदागर परिसरातील रोझ आयकॉन सोसायटी, कुणाल आयकॉन, जरवरी, रोसलँड, लक्षदीप पॅलेस, राजवीर पॅलेस, अलको सोसायटी, दीपमाला अशा विविध सोसायट्यांमध्ये व उन्नति सोशल फाउंडेशन येथे ज्येष्ठ नागरिक व आनंद हास्य क्लब सोबत खास धुलीवंदनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. मोठ्या संख्येने नागरिक उत्सवात सहभागी झाले होते.
उन्नती सोशल फाउंडेशन तथा भाजपा चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी परीसरातील प्रत्येक सोसायटीत प्रत्यक्ष जाऊन नागरिकांना होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच होळी आणि रंगांचे महत्व नागरिकांना पटवून दिले. सोसायटीतील नागरीक उत्सवानिमित्त एकत्र येत एकजुटीचे दर्शन घडवितात. त्यामुळेच खरी एकजुटीची भावना वाढीस लागते. ऐकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते, असे मत यावेळी कुंदा भिसे यांनी व्यक्त केले. तसेच केमिकलऐवजी नैसर्गिक रंगांनेच धुळवड साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.