breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कावड यात्रेतील भाविकना श्रावणी सोमवार निमित्त अल्पोपहार!

आमदार महेश लांडगे युवा मंच व दिनेश यादव मित्र परिवारचा उपक्रम

पिंपरी : आमदार महेश लांडगे युवा मंच व दिनेश यादव मित्रपरिवार यांच्या वतीने कावड यात्रेत सहभागी भाविकांना अल्पोपहारचे वाटप करण्यात आले.

सालाबादप्रमाणे आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने चिखली ते घोराडेश्वर पायी कावड यात्रा आज सुरुवात झाली. विश्व हिंदु परिषद बजरंग दल चिखली प्रखंड व व्यापारी संघटना चिखली वतीने ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर ते घोरडेश्वर डोंगर पायी कावड यात्रा आयोजित केलेली होती सकाळी पुजा करुन कावड यात्रेला सुरुवात झाली, हजारो च्या संख्येने भाविक कावड यात्रेत सहभागी झाले होते.

हेही वाचा –  ‘मनोज जरांगेंमुळे समाजात दोन गट पडले’; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

या भाविकांना आमदार महेशदादा लांडगे युवा मंच व दिनेश यादव मित्र परिवार वतीने अल्पोपहार वाटप करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button