देहू नगरपंचायतीची आज पहिलीच निवडणूक, शांततेत मतदान सुरु!
![Dehu Nagar Panchayat's first election today, peaceful voting begins!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Image-2021-12-21-at-11.54.44-AM-1.jpeg)
तळेगाव । प्रतिनिधी
देहू नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक आज पार पडत आहे. त्यासाठीएकूण पस्तीस मतदान केंद्रावर मतदान सुरु आहे. त्याचीच लगबग सध्या श्री क्षेत्र देहूनगरीत पहायला मिळत आहे.ही पहिलीच निवडणूक असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा देहूत तैनात करण्यात आला आहे. मतदाना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त आहे. या होणाऱ्या मतदानासाठी एकूण ३ पोलिस निरीक्षक, १४ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक आणि ७३ अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी या निवडणुकीसाठी करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग जर केला तर त्याच्यावर ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं प्रशासकीय अधिकारी संजय असोले (निवडणूक अधिकारी) यांनी स्पष्ट केले.
आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. त्यात दोन अधिकारी आणि सहा अंमलदार आहेत अशी माहिती देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रावसाहेब जाधव यांनी दिली.